Last Updated: Saturday, September 15, 2012, 22:49
www.24taas.com, कोलंबो भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर’नं गौरवण्यात आलंय. विराट कोहलीनं २०११-१२ सीझनमध्ये ३१ वन-डेत ६६.६५ च्या सरासरीनं १७३३ रन्स केले आहेत. यामध्ये आठ सेंच्युरीजचा समावेश आहे. १८३ रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला कोहली गेल्या काही महिन्यांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करतोयविशेष म्हणजे भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी, लसिथ मलिंगा आणि कुमार संगकारा यांना पिछाडीवर टाकत कोहलीने हा पुरस्कार पटकावलाय. यावर्षी आयसीसी पुरस्कार पटकावणारा कोहली एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. तर श्रीलंकेच्या कुमार संघकाराला यावर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
First Published: Saturday, September 15, 2012, 22:49