टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’World T20: India lose warm-up game against Sri Lanka

टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’

टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’
www.24taas.com, वृत्तसंस्था, मीरपूर

टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्‍यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.

श्रीलंकेच्या १५४ रन्सचा पाठलाग करणार्‍या टीम इंडियाला १४८ रन्सपर्यंतच मजल मारता आली. सुरेश रैना ४१, युवराज सिंग ३३, आर. अश्‍विन १९ आणि विराट कोहलीनं १७ रन्स केले खरे पण त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. मलिंगानं ३० रन्स देऊन ४, तर नुवान कुलशेखरानं ३७ रन्स देऊन २ विकेट घेतल्या.

दरम्यान, या आधी पहिले बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं १५३ रन्स केले. महेला जयवर्धनेनं ३०, दिनेश चंडीमलनं २९ रन्स केले. तर अश्‍विननं प्रभावी फिरकी गोलंदाजी करीत २२ रन्सच्या मोबदल्यात तीन बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पाकिस्तानचा न्यूझीलंडवर विजय<./b>

आशिया चषक स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाल्यामुळं उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या पाकिस्तान टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये न्यूझीलंडवर ६ विकेट आणि १ बॉल राखून मॅच जिंकली आणि आपला चांगला फॉर्म कायम राखला. कामरान अकमलनं ५२ तर मोहम्मद हाफीजनं ५५ रन्स करत पाकिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

नेदरलँड, आयर्लंडची दमदार सुरुवात

‘अ’ गटामधून नेपाळ आणि बांगलादेशनं आश्‍वासक सुरुवात केल्यानंतर आता सोमवारी झालेल्या ‘ब’ गटातील पात्रता फेरीतील लढतीत नेदरलॅण्ड आणि आयर्लंड या देशांनी अनुक्रमे संयुक्त अरब अमिरात आणि झिम्बाब्वेला पराभूत करत मुख्य फेरीच्या दिशेनं पाऊल टाकलं. नेदरलँडनं अरब अमिरात संघावर ६ विकेट राखून विजय मिळवला, तर आयर्लंडनं झिम्बाब्वेला ३ विकेट राखून हरवलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 10:38


comments powered by Disqus