युवी-गेल करणार `गंगनम स्टाईल`! Yuvi and Gayle play Gangnum style

युवी-गेल करणार `गंगनम स्टाईल`!

युवी-गेल करणार `गंगनम स्टाईल`!
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल `आईपीएल`च्या सातव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनच खेळणार आहे. या हंगामात गेलने युवराज सिंग सोबत खेळण्यास उत्सुकता दर्शवली आहे.

ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अधिकृत वेबसाईटवर सांगितलं, "हो! मी काही आंतराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्यास खूपचं उत्सुक आहे. `युवी` भारताचा स्टार खेळाडू आहे. अशा नामवंत खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं खूप मजेची गोष्ट आहे". गेल पुढे म्हणचो, "युवराज आणि मी लोकांचं मनोरंजन चांगलं करु शकतो. तसेच या पर्वात आम्ही अंतिम सामन्यात पोहचण्याचा प्रयत्न करु".

गेलने एक मजेशीर गोष्ट सांगितली. गेलने मनोरंजनच्या दृष्टीकोनातून सांगितलं की,"मी आणि युवराज एकत्र गंगनम स्टाईलने डांस करणार आहोत. माझी अशी खात्री आहे की युवराज देखील हे करण्यास उत्सुक असेल. आम्ही मजा करण्यासाठी तयार आहोत. तसेच आमची टीम दोन वर्षाच्या खराब प्रदर्शनानंतर या वर्षी आम्ही ट्राफी जिंकण्यासाठी खूपच उत्सुक आहोत".

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 14:23


comments powered by Disqus