आयपीएल बुकी अटक, CCTV मध्ये कैद..., Ipl bookie arrest, footage in cctv

आयपीएल बुकी अटक, CCTV मध्ये कैद...

आयपीएल बुकी अटक, CCTV मध्ये कैद...
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

आयपीएल मॅचमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तीन बुकिंना दिल्ली पोलिसांनी औरंगाबादमध्ये अटक केलीये. दिल्ली पोलिसांची ही कारवाई सीसीटीव्हीत कैद झालीये. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम बुकींचा पाठलाग शिर्डीपासून करीत होती. बुकी सुनिल भाटीया, किरण डोले आणि मनिष गुड्डेवार औरंगाबादच्या सिडको परिसरातील हॉटेल लेमन ट्रीमध्ये आले.

सीसीटीव्हीच्या पहिल्या दृश्यात बुकिंची अलिशान कार हॉटेलच्या गेटमधून आत शिरताना दिसते. तर दुस-या सीसीटीव्ही कॅंमे-याच्या फुटेजमध्ये बुकी हॉटेलच्या रिसेप्शनला थांबल्याचे दिसतात. तिथं त्यांनी हॉटेलमधील रुम बूक केली. त्यानंतर काही वेळानं दिल्ली पोलिसांची टीम हॉटेलमध्ये दाखल झाली.

ही टीम मोबाईल ट्रेसिंगच्या सहाय्यानं या बुकिंच्या मागावर होती. त्यांनी पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये स्वतंत्ररित्या कारवाई केली. ही कारवाई सकाळी सहापर्यंत सुरु होती. तिस-या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आपण हे स्पष्टपणं पाहू शकता.... दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची ही कारवाई धडक अशीच म्हणावी लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013, 13:29


comments powered by Disqus