Last Updated: Tuesday, May 21, 2013, 11:16
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी माजी रणजीपटू बाबुराव यादव याला अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादवला सोमवारी रात्री दिल्लीमध्ये अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून अजित चंदेलियाबद्दल चौकशी करण्यात येतेय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर बाबुराव यादव याला रेल्वेनंही निलंबित केलंय. सिग्नल आणि टेलिकॉम विभागात ऑपरेटर पदावर कार्यरत असणारा बाबुराव यादव नागपूरमध्ये दक्षिण मध्य रेल्वेसाठी कार्यरत होता.
बाबुरावनंच सट्टेबाज सुनील भाटिया याची राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजीत चंदेलियाशी भेट घालून दिली होती, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
या प्रकरणात आत्तापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आलीय. यामध्ये तीन आयपीएल खेळाडू, चार माजी खेळाडू आणि ११ सट्टेबाजांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या एस. श्रीसंत, चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे. तीन खेळाडू आणि सर्व आरोपींना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 09:46