W म्हणजे विकेट नाही, वुमन,वाईन आणि वेल्थ, w mean woman, wain and wealth

W म्हणजे विकेट नाही, वुमन,वाईन आणि वेल्थ

W म्हणजे विकेट नाही, वुमन,वाईन आणि वेल्थ

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटमध्ये विकेट आणि वाइड बॉलसाठी W हा शब्द वापरला जातो. मात्र आता क्रिकेटमध्ये W या शब्दाचा अर्थ बदललाय....काय आहे या शब्दाचा अर्थ पाहूयात एक रिपोर्ट..

क्रिकेटमध्ये Wचा अर्थ काय ?
आता क्रिकेटमध्ये W म्हणजे विकेट नसते
आता क्रिकेटमध्ये Wम्हणजे वाईड बॉलही नसतो
आता क्रिकेटमध्ये Wचे केवळ तिनच अर्थ आहेत
W म्हणजे वाइन
W म्हणजे वूमेन
W म्हणजे वेल्थ


हेच तीन W आता क्रिकेटमध्ये शिल्लक आहेत. तीन W वूमेन, वाइन आणि वेल्थ म्हणजे ललना, दारु आणि पैसा... हे रंगीन क्रिकेट आहे, ज्याचे सारेच दिवाणे आहेत.

...आणि हा आहे IPLचा काळा चेहरा...हा काळा चेहरा समोर आल्यानंतर रोमांच आणि रंगीन क्रिकेटच खर रुप सा-यांसमोर येऊ लागलय. ज्या आयपीएलची दुनिया दिवानी आहे. ज्या खेळासाठी कोट्यावधी लोग आपला अमूल्य वेळ दवडतात. त्याच आयपीएलमध्ये आता जे खुलासे होत आहेत ते अचंबित करणारे आहेत.

आयपीएलमध्ये सट्टेबाजांकडून केवळ क्रिकेटपटू आणि लोकांचा विश्वासच विकला जात नाही तर खेळाडूंना फसवण्यासाठी जाळही पसरवल जात आहे.

खेळाडूंसाठी हनी ट्रॅप !......सट्टेबाजांकडून ललनांचा वापर...खेळाडूंना फसवण्यासाठी ललनांचाही वापर…
क्रिकेटच जर दारू, सट्टेबाज आणि ललनांशी नात जोडल जात असेल, तर आयपीएल ही तीच जागा आहे की जिथे मॅच, क्रिकेटपटू आणि बॅट्समनच्या सेंच्युरीपेक्षाही आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच अधिक चर्चेत आहे...

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 20:29


comments powered by Disqus