दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक - Marathi News 24taas.com

दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक

www.24taas.com, मुंबई
 
बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.
 
शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच बारावी आणि दहावीच्या परीक्षचे वेळापत्रक जाहीर करण्याचे धोरण शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सुरू केले. त्यानुसार हे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा गुरुवार, २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ या महिनाभराच्या कालावधीत होईल. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) या विषयाची ऑनलाइन परीक्षा २२, २३ आणि २५ मार्च २०१३ या दिवशी होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी जाहीर केले.
 

कोठे पाहाल वेळापत्रक


 

वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा


 
दहावीची परीक्षा शनिवार, २ मार्च २०१३ रोजी सुरू होईल व २५ मार्च २०१३ रोजी संपेल. या दोन्ही परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक www.msbshse.ac.in  या संकेतस्थळावर रविवार एक जुलैपासून विद्यार्थ्यांना पाहता येईल, असेही जाधव यांनी सांगितले.



दरम्यान,  यंदा बारावीच्या निकालानंतर माहितीच्या अधिकाराअंतर्गत ७७४० उत्तरपत्रिकांच्या प्रती मागण्यात आल्या होत्या. पैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांच्या बाबतीत गुणांमध्ये कसलाही बदल झाला नाही; तर दहावीच्या निकालानंतर एकूण ३६६७ उत्तरपत्रिकांच्या प्रतींची मागणी झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त १११४ अर्ज मुंबईतून आले आहेत, तर सर्वात कमी ५५ अर्ज कोकणातून आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

First Published: Monday, July 2, 2012, 21:27


comments powered by Disqus