Last Updated: Wednesday, October 19, 2011, 09:57
झी २४ तास वेब टीम, मुंबई
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा अवघ्या दोन जिल्ह्यांसाठी असलेले कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील सर्वात लहान विभागीय मंडळ ठरणार आहे. याचं मुख्यालय रत्नागिरीमध्ये असणार आहे. मात्र, राजकीय विरोधानंतर नवी मुंबई वा रायगडचा या कोकण मंडळात समावेश टाळण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या कोकणातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे आणि कोल्हापूर बोर्डावर अवलंबून राहावं लागणार नाही.
First Published: Wednesday, October 19, 2011, 09:57