बीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!, big B amitabh bachchan in mhasala, raigad

बीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!

बीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!
www.24taas.com, झी मीडिया, रायगड

बॉलिवूडचा महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सपत्नीक रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगावाला भेट दिली. अमिताभ बच्चन गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळा गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला.

खामगाव हे रायगडच्या म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम गाव असून अमिताभ आणि जया बच्चन हे  एका स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमाला भेट देण्यासाठी इथं आले होते. त्यांनी मोठ्या आस्थेने इथल्या प्रकल्पाची पहाणी केली.

 अमिताभ  आणि जया बच्चन या दाम्पत्याने केवळ प्रकल्पाची पाहणीच केली असं नाही तर भारतीय बैठक घालून तिथल्या घरगुती जेवणाचा अस्वादही घेतला. चक्क महानाय़काला पाहण्याची संधी मिळाल्यामुळे गावकऱ्यांना आकाश ठेंगणं झालं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 20:51


comments powered by Disqus