Last Updated: Wednesday, June 5, 2013, 00:00
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेरेल्वेच्या इतिहासात ठाणे रेल्वे स्थानकाचं वेगळ महत्व आहे...कारण देशातली पहिली रेल्वे ज्या दोन स्थानकांदरम्यान धावली त्यापैकी ठाणे एक आहे...रोज लाखो प्रवासी येथून प्रवास करत असले तरी प्रवाशांना मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागतो..आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी एक प्रवासी म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला..त्यांना जो अनुभव आला तो पहाता रेल्वे प्रवासी कोणत्या अवस्थेत प्रवास करत असतील हे तुमच्याही लक्षात येईल..
मायानगरी मुंबई....
या शहराची बातचं काही और आहे...देशाच्या कानाकोप-यातून रोज शेकडो लोक इथं येतात...ही चमचमती दुनिया प्रत्येकाला भूरळ घालते..सतत धावणा-या या शहराची लाईफ लाईन म्हणजे इथली लोकल ट्रेन...
रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात...या शहराला वेगवान ठेवण्यात लोकलची महत्वाची भूमिका आहे...भारतातील पहिली रेल्वे सीएसटी ते ठाणे या स्थानका दरम्यान धावली...ठाणे रेल्वे स्थानकात पहिल्यांदा रेल्वे आली त्याला आज जवळपास १६० वर्ष उलटून गेलीत...काळाच्या ओघात इथं बरचं काही बदललं पण य दरम्यान लोकलने प्रवास सुखकर होण्याऐवजी तो बिकट बनत गेला... रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्व असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनचं वास्तव आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत... आमच्या कॅमे-याने जे काही टीपलंय ते मोठं धक्कादायक आहे. लोकल प्रवाशांना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत...
१६ एप्रिल १८५३ भारतातील पहिली रेल्वे ज्या दोन स्थानका दरम्यान धावली त्यातील ठाणे हे एक रेल्वे स्थानक. रोज साडे सहा लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी कोणत्या सोईसुविधा आहे हे आता आपण पहाणार आहोत.
लोकलने प्रवास करायचं म्हटलं की तिकीट असणं आवश्यक आहे.
वेळ वाचवण्यासाठी आम्ही सीव्हीएम कुपन्सचा वापर करण्याचं ठरवलं..कुपन्स पंच करण्यासाठी आम्ही रेल्वे स्थानकातल्या सीव्हीएम मशिन जवळ गेलो...आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदीचा पहिला अनुभव आम्हाला आला.... रेल्वे स्थानकातील सीव्हीएम मशिन बंद असल्याचं आढळून आलं...ठाणे रेल्वे स्थानकात अनेक सीव्हीएम मशिन आहेत..त्यामुळे एखाद मशिन बंद असेल अस समजून आम्ही दुस-या मशिन जवळ पोहोचलो...पण तिथंही तोच अनुभव आला.. एखाद-दोन मशिन बंद असतील अस समजून आम्ही तिस-या मशिनकडं गेलो पण तिथही तोच अनुभव आला...आम्ही एकापाठोपाठ सर्व दहा सीव्हीएम मशिन बघीतल्या पण एकही मशिन चालू स्थितीत नव्हतं..
आमची ही धडपड एका रेल्वे कर्मचा-याच्या लक्षात आली आणि त्याने सीव्हीएम मशिन बंद असल्याचं इशा-याने सांगितलं...तसेच कुपनवर स्टँप मारण्याचा सल्ला दिला...पण तिथही हे चित्र होतं...कुपन्सवर स्टँप मारण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता..प्रवासी घाईघाईत स्टँपमारत होते..पण घाईघाईत स्टँप मारतांना तारीख चुकल्यास विनातिकीट प्रवास केल्याबद्दल दंडाचा भूर्दंड प्रवाशीच्या माथी येण्याची शक्यता असते...पण इथलं हे चित्र काही एका दिवसापुरतं नव्हतं..गेल्या अनेक महिन्यापासून सीव्हीएम मशिन्स बंद असल्याचं नियमीतपणे प्रवास करणा-यांनी सांगितलं..
त्यानंतर आम्ही एटीव्हीएमचा पर्याय निवडला...तिकीटांसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी आम्ही एटीव्हीएमच्या माध्यमातून तिकीट काढण्याचं ठरवलं...खरं तर रेल्वेनेही एटीव्हीएमचा मोठा गाजावाजा केला...पण रेल्वेची ही योजनाही प्रवाशांच्या किती कामी य़ेते हे तुमच्या लक्षात येईल..सीव्हीएम प्रमाणेच एटीव्हीएमच्या मशिनचीही अवस्था असल्याचं पहायला मिळालं...जे मशिन्स सुरु होते तिथं रेल्वे कर्मचारी प्रवाशांना तिकीट काढून देण्याचं काम करत होते..आम्ही एटीव्हीएम मशिनमधून तिकीट काढण्यासाठी गेले पण तिथंही रंगेनं आमचा पिच्छा काही सोडला नाही..त्यामुळे आम्ही तिकीट खिडकीचा मार्ग निवडला..तिकीट खिडकीवर भल्या मोठ्या रांगेनं आमचं स्वागत केलं..त्यामुळे आम्ही फूट ओव्हर ब्रीजवर असलेल्या एटीव्हीएम मशिनजवळ गेलो..पण ते मशिनही बंद अवस्थेत आढळून आलं..बंद असलेलं मशिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर्मचा-यांकडून केला जातं होतं..त्यामुळं आम्ही तिकीट खिडकीवरुन तिकीट घेण्याचा निर्णय घेतला...आम्ही तिकीटाच्या रांगेत उभे राहिलो..खरं तर ती गर्दीची वेळ नव्हती...पण तरीही तिकीट काढण्यासाठी आम्हाला १५ मिनिटं लागली...
ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी तिकीटापासून ते एटीव्हीएम मशिन्सची सुविधा असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो खरा पण त्याचं वास्तव आताच तुम्ही बघीतलंय.... तिकिट असो की कुपन अथवा स्मार्ट कार्ड तुम्ही कोणताही पर्याय निव़डला तरी रेल्वे प्रशासनाच्या आनागोंदीचा फटका तुम्हाला बसणारचं...
प्रवास लोकलचा असो की लांब पल्ल्याच्या ट्रेनचा... प्रवासी खाण्यापिण्याचे पदार्थ खरेदी करतात..पण तुम्ही जे पदार्थ खरेदी करता ते खरंच खाण्यासाठी योग्य आहेत का? त्याची गुणवत्ता तापसली जाते का ? कोणत्या ठिकाणी ते तय़ार केले जातात ?याचा कधी विचार केला? नाही ना? मात्र आम्ही याचा शोध घेतला आणि जे सत्य समोर आलं धक्कादायक होतं...
ठाणे रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे अनुभवल्यानंतर आम्ही स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची काय सोई आहे हे जाणून घेण्याच्या प्रयत्न केला...रेल्वे स्टेशनवर पाणपोई पहायला मिळतात म्हणून आम्ही पाणपोई गाठली.... ..पण तिथही रेल्वेनं आमचा भ्रमनिरास केला..प्लॅट फॉर्मवरची पाणपोई बंद असल्याचं आढळून आलं...पाणीपोईच्या नळाला पाणी नसल्यामुळे त्याची थुंकदाणी केली होती.. बरीच शोधाशोध केल्यानंतर एक पाणपोई दोन नंबरच्या प्लॅट फॉ़र्मवर चालू स्थितीत आढळून आली...एखाद्या प्रवाशाला तहान लागल्या त्याला चार प्लॅट फॉर्म ओलांडून जावं लागतं ही ठाणे रेल्वेस्थानकातली अवस्था आहे..पिण्याच्या पाण्याची ही अवस्था पाहून आम्ही खाद्यपदार्थांचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला..आम्ही रेल्वे स्टेशनवरच्या एका स्टॉलसवर गेलो...खाद्यपदार्थांवर माशा घोंगावत होत्या...शेजारीच असलेल्या कचरापेटी पूर्णपणे कच-याने भरली होती..पण त्याकडं कुणाचं लक्ष नव्हतं....तिथलं वातावरण पाहून कोणताच पदार्थ खाण्याची इच्छा झाली नाही...त्यामुळे हे पदार्थ कुठं तयार केला जातात याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक धक्कादायक सत्य आमच्या कॅमे-याने कैद केलं...रेल्वे स्थानकातील एका प्लॅटफॉर्मवरच्या एका लहान खोलीत ते खाद्य पदार्थ तयार केले जात होते...तिथलं वातावरण कोंदट तसेच स्वच्छतेचा अभाव होता..खरं तरं इथं खाद्यपदार्थ तयार केले जात असल्यामुळे इथं स्वच्छता राखली जाणे आवश्यक आहे..पण इथं परिस्थिती अगदी उलटी होती...अशा प्रकारच्या वातावरणात रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि त्याची प्रवाशांना विक्री केली जाते..खरं तर रेल्वेत तसेच रेल्वे स्थानकात विक्री केल्या जाणा-या खाद्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा आहे.. आयआरसीटीकडून गुणवत्ता तपासली जाते त्याचं कार्यालाय दादर इथं आहे..पण ठाणे रेल्वे स्थानकात ज्या क्वॉलिटिचे खाद्यपदार्थ विकले जातातं ते पहाता रेल्वेच्या खानपान विभागाकडून खरंच इथल्या पदार्थांची गुणवत्ता तपासली जाते काय हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही..रेल्वे स्टेशनवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची अवस्था तुमच्या लक्षात आलीच असेल...तुम्ही रोज प्रवास करतांना स्ट़ॉलवरुन जे खाद्या पदार्थ खरेदी करतात ते कुठं तयार केले जातात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल..खाद्यपदार्थांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही प्रसाधनगृहांची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला..ठाणे रेल्वे स्टेशनवर एकूण दहा प्लॅटफॉर्म असून केवळ तीन ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे..
ठाणे रेल्वे स्थानकात रोज लाखो प्रवाशांची वर्दळ असतांना केवळ त्यांच्यासाठी केवळ तीन टॉयलेटची सुविधा आहे..ही एकप्रकारे रेल्वे प्रवाशांची क्रुर थट्टाच आहे...विशेष म्हणजे लोकप्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाडीही इथं थांबतात त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बराचवेळी इथं थांबवं लागतं...असं असतांनाही रेल्वे प्रशासनाला मात्र त्यांची जराही फिकीर नाही...
ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या सेवासुविधांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही इथली सुरक्षा आणि इतर बाबींची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला..इथल्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं आढळून आलं..
ठाणे रेल्वे स्थानकाचा आम्ही फेरफटका मारला असला असता रेल्वे प्रवाशांना कोण कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे एकापाठोपाठएक उघड होत गेलं...भिकारी...मनोरुग्ण...गर्दुले हे तर रेल्वे स्थानकात ठाण मांडून आहेत...ठाणे रेल्वेस्थानकही त्याला अपवाद नाही...इथ ठिकठिकाणी तुम्हाला भिकारी..गर्दुले आणि मनोरुग्ण पहायला मिळतील...त्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांनीही इथं आपला डेरा जमवला आहे..विशेष म्हणजे तिकीट खिडक्यांजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर असतो..प्रवाशांच्या पायाजवळ पंख्याची हवा खात ही कुत्री पहूडलेली असल्याचं पहायला मिळालं..प्लॅटफॉर्म तर त्यांच्या हक्काची जागा आहे..रेल्वे प्रशासनाला त्याचं काहीच वाटत नाही...त्यांना हाकलून लावण्याची तसदी घेतांना कोणी दिसत नाही.. आम्हाला रेल्वे स्टेशनवर ठिकठिकाणी हेच चित्र पहायला मिळालं..आम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनवर होतो तेव्हा एक माहूत थेट हत्तीघेऊन स्टेशन परिसरात आला होता..त्याचा वाहतूकीला अडथळा होत असला तरी दिवसभर तो तिथच होतं.. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात ना फेरीवाला क्षेत्र लावलेला बोर्ड आम्हाला दिसला...पण तिथ परिस्थीती त्या उलट होती..त्या बोर्ड खाली एक फेरीवाला होता...हा बोर्ड केवळ नावापूरताच असल्याचं आढळून आलं..त्या फेरीवाल्याला कोणाचीच भीती नसल्याचं पहायला मिळालं...रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छतेच्या नावाने बोंब होती..गटारांच्या बाजूला उपसून टाकलेला गाळ त्यावर घोंगणा-या माशा,डास त्यांच्या बाजूलाच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ...हे सगळं काही लाखो प्रवासी रोज अनुभवतात... काही ठिकाणी तर फूट ओव्हर ब्रीजवर छत नसल्याचं पहायला मिळालं..त्यामुळे प्रवाशांना उन्हातून य़े-जा करावी लागते...पावसाळ्यातही प्रवाशांवर भिजण्याची वेळ येणार आहे...
ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध सेवा सुविधांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही सुरक्षे बाबत काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली...पण एव्हड्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतरही रेल्वे प्रशासनानं कोणताच धडा घेतला नाही..
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडच्या प्रवेशदारावर सात मेटल डिटेक्टर तसेच एक स्कॅनिंग मशिन आहे..पण हे सगळे मशिन बंद असवस्थेत आहे..तिच अवस्था पश्चिमेकडच्या प्रवेश द्वाराची आहे..पश्चिमेकडं चार मेटल डिटेक्टर आणि एक स्कॅनिंग मशिन आहे पण ते नादुरुस्त आहे..खरं तर लाखो रुपये खर्च करुन हे मशिन्स बसवण्यात आले पण ते केवळ नावापूर्तेच आहेत... ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी या दोन प्रवेश द्वारांव्यतिरिक्तही प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मार्ग आहेत तिथं तर कोणत्याच प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याचं पहायला मिळालं...अशा परिस्थितीत रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही...
ठाणे रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवास लोकल ट्रेन मधून प्रवास करत असून त्यांना रोज अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो...पण रेल्वे प्रशासनाला मात्र त्याची जराही फिकीर नाही आणि हेच लाईफ लाईनचं वास्तव आहे !
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, June 5, 2013, 00:00