मृत्यूपूर्वी जिया खानचे सहा पानी पत्र, Here, Jiah had written in his suicide note

जिया खानचे मृत्यूपूर्वी सहा पानी पत्र

जिया खानचे मृत्यूपूर्वी सहा पानी पत्र
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तिने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे सूरज अडचणीत आला आहे. आता पोलिसांच्या हाती नवीन पुरावा लागला आहे. जिया खानच्या कुटुंबीयांनी पोलिसांना जिया खानचे सहा पानी पत्र दिले आहे. मृत्यूपूर्वी जियाने हे पत्र लिहिले असल्याचे म्हटले जात आहे.

जिया खानचे आत्महत्येपूर्वी एका अभिनेत्याच्या मुलासोबत तणावपूर्ण प्रेमसंबंध होते. तशा आशयाचे सहापानी पत्र जियाच्या घरातून खान कुटुंबीयांना मिळाले आहे. याआधी पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीची कसून चौकशी केली होती.

जियाच्या घरी मिळालेल्या पत्राची सत्यप्रत पोलिसांना देण्यास खान कुटुंबाने अनुकूलता दर्शविली आहे. या पत्रानुसार अभिनेता आदित्य पांचोली आणि जरिना वहाब यांचा मुलगा सुरज यांच्याबरोबर जियाचे तणावपूर्ण संबंध होते. मात्र, या पत्रात सुरजचे नाव आहे की नाही, याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला. हे पत्र जियानेच लिहिले आहे का, याबाबत पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पत्रातील अक्षर जियाचेच असल्याचा दावा खान कुटुंबाने केला आहे.

जिया खानने २ जूनच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रेमात आणि करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे नैराश्येपोटी जियाने आपली जीवनयात्रा संपवली अशी चर्चा होत आहे. जियाने पत्रात लिहिले आहे की, तू माझी फसवणूक केली आहे. मी आपल्या नात्यावर विश्वास ठेवला होता. मात्र तू आपल्या नात्याची कधीचत पर्वा केली नाही. तू जेव्हा हे पत्र वाचशील, तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. आता या पत्रावरुन जियाच्या आत्महत्येमागील गुढ उकण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 9, 2013, 08:43


comments powered by Disqus