Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:16
www.24taas.com, अलिबाग सिंचन क्षेत्रात पाण्याच्या नावाखाली पैसा कसा जिरवला जातो याच्या एकाहून एक सुरस कथा ऐकायला मिळतात. रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची अशीच एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.
रायगड जिल्ह्यातल्या पोलादपुर तालुक्यातलं साडेतीन हेक्टर जमीवर पसरलेलं हे धारवली-कालवली धरण आहे... तुम्हाला दिसत नसलं तरी इथं धरण आहेच... आणि हो या धरणासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. हे आम्ही सांगत नाही तर राज्याच्या सिंचन विभागाच्या लेखी इथं धरण आहे.....2000 साली या धरणाचं काम अचानक सुरू झालं. आणि तशाच प्रकारे 2003 मध्ये ते बंदही झालं.
ग्रामस्थ आसपासच्या दहा गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि शेती ओलिताखाली यावी या उदात्त हेतून हे धरण बांधण्यात येणार होतं. त्यामुळं इच्छा नसतानाही पाण्याची सोय होईल या आशेपोटी इथल्या शेतक-यांनी धरणासाठी जमिनी दिल्या. मात्र गेल्या 12 वर्षांत या धरणात एक थेंबबरही पाणी साठलं नाही.
धरणासाठी जमिन विकत घेतल्यानंतर आणि धरणाचं काम सुरू झाल्यानंतर ही जमीन वनजमिन असल्याचं सिंचन विभागाच्या लक्षात आलं. पाण्यासाठी खर्च केलेले 100 कोटी रुपये पाण्यात गेले. पाणीतर दूरच, पण हक्काची शेती गेली, धरणाच्या नावाखाली दहा गावांना जोडणारा रस्ताही बंद झाला, हाती काहीच आले नाही अशी इथल्या शेतक-यांची स्थिती झाली आहे. मात्र, इथल्या शेतक-यांची तहान भागली नाहीच मात्र 100 कोटी रुपयांनी पोटं भरली, हे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Thursday, May 17, 2012, 09:16