Last Updated: Friday, December 23, 2011, 13:18
झी २४ तास वेब टीम, ठाणे ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.
यंदाच्या मोसमात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील बहुतांश शेतक-यांनी साईराम निर्मल कंपनीचं भाताचं बियाणं वापरलं. अधिक उत्पादन देणारी जात असल्याची जाहिरात या कंपनीने केली होती. नविन वाण असल्यामुळे सव्वा तीनशे हेक्टरवर या वाणाची लागवड करण्यात आली. मात्र एन.आर.9 या वाणाच्या भाताला लोंबच आले नाही.
पहिल्याच वर्षी साईराम निर्मल कंपनीचं एन.आर.9 या कंपनीचा वाण शेतात आलचं नसल्यानं शेतकरी पूर्ण उध्वस्त झालाय. 12 किलोच्या बियाण्याची किंमत 650 रुपये असून एक एकरसाठी 12 किलो बियाणे लागले. अशाप्रकारे बियाण्यासाठी एक एकराला 7 ते 8 हजार रुपयांचं खर्च शेतक-यांना आला.मात्र बोगस बियाण्यामुळे बियाण्याचं खर्चासह आंतरमशागतीचा खर्च हि शेतक-यांचा वाया गेला. त्याबरोबरच कर्जबाजारी शेतक-याचं या वर्षीचं उत्पादन हि गेलं. या संदर्भात मात्र मुरबाड तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषी अधिकारी घोलप यांनी खोड किडीमुळे नुकसान झाल्याचा चुकीचा अहवाल शासनाला पाठवलाय.
अधिक उत्पादन मिळण्याच्या हेतुने शेतकरी आधुनिक वाणांचा उपयोग करतो शासनातील अधिकारी मात्र कंपनीबरोबर हित जोपासून शेतक-यांना खोट ठरवतात हे बाब काही नविन नाही. त्यामुळे राज्यात बोगस बियाणे संदर्भात आजवर शेकडो प्रकरणे न्यायावीना प्रलंबीत आहेत. अधिवेशनातही कृषी मंत्री आणि लोकप्रतिनीधींनी अशा प्रश्नांना मार्गी लावण्याचं कधी प्रयत्न होतांना दिसत नाही.
First Published: Friday, December 23, 2011, 13:18