मला परत क्रिकेट खेळायचंय, अंकितचं आर्जव, ankit chavhan wants to play cricket again

मला परत क्रिकेट खेळायचंय, अंकितचं आर्जव

मला परत क्रिकेट खेळायचंय, अंकितचं आर्जव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘मी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलंय… मला परत क्रिकेट खेळायचंय… न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्यासाठी सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा मला आहे’ असं अंकित म्हणतोय अंकित चव्हाण...

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातला आरोपी अंकित चव्हाण यानं आज आपलं म्हणणं लोकांसमोर मांडण्यासाठी एका पत्रकार परिषदेला सामोरा गेला. पण, यावेळी त्यानं पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता केवळ ‘मला क्रिकेट परत खेळायचंय’ असं सांगत तिथून काढता पाय घेतला.

संघटीत गुन्हेगारीचे पुरावे सादर करण्यात पोलीस अपयशी ठरल्याने अंकित चव्हाण आणि श्रीशांतसह १९ जणांना ११ जून रोजी जामीन मंजूर केला. याआधी, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या अंकितला लग्नासाठी कोर्टानं ३० मे रोजी आठ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. २ जून रोजी आयटी कन्सलस्टंट असलेल्या नेहा सांबरी हिच्याशी अंकित विवाहबद्ध झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 13, 2013, 11:37


comments powered by Disqus