श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!, Delhi Police invokes MCOCA provisions against Sreesanth

श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!

श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.

दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कलमं लावण्यात आल्याची माहिती दिली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सर्व म्हणजे २६ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत अपराध नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कलमं दाखल करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. याबद्दल स्पष्टीकरण देताना, हे सर्व आरोपी अपराध जगतातील डॉन दाऊद इब्राहिम तसंच त्याचा सहयोगी छोटा शकील यांच्या बेकायदेशीर कामांमध्ये त्यांना मदत करत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

मोक्का कायद्याच्या मदतीनं पोलिसांना आरोपींच्या कोठडीत वाढ झाल्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशीही करण्यात येईल, असं मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट लोकेश कुमार शर्मा यांना सूचित करण्यात आलं.

First Published: Tuesday, June 4, 2013, 16:42


comments powered by Disqus