Last Updated: Thursday, June 6, 2013, 14:28
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी क्रिकेटर अंकित चव्हाण पुन्हा एकदा तुरुंगात जाण्यासाठी गुरुवारी पहाटेच दिल्लीला रवाना झाला. विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी त्याची नववधू नेहा सांबरीदेखील उपस्थित होती.
दोन जून रोजी अंकीत चव्हाण यानं नेहा सांबरीशी लग्नगाठ बांधली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या तुरुंगात गेलेल्या अंकीतला लग्नासाठी म्हणून आठ दिवसांचा जामीन मिळाला होता. दिल्लीच्या न्यायालयानं अंकीतचा जामीनाचा अर्ज स्विकारत ३० मे रोजी ला अंकितला सशर्त जामीन मंजूर केला होता.
जामीनाची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्याला गुरुवारी पुन्हा तुरुंगात जावं लागलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 6, 2013, 14:28