गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`, Attention, Girgaum Chowpatty on Sting Ray Fish

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.

स्टिंग रे सदृश मासे तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. यासंदर्भात अहवाल येणं बाकी आहे. मात्र नागरिकांनी दक्षता बाळगणं गरजेचं आहे. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर जवळपास ५० जणांना स्टिंग रे सदृष्य माशांचा त्रास झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे.

गिरगाव चौपाटी विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. महापालिका आणि पोलीस नियंत्रण कक्ष तयार आहे. फर्स्ट एड आणि ऍम्ब्युलन्सही सज्ज आहेत. स्टिंग रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केलीय. गिरगाव चौपाटीवर दोन अतिरिक्त तराफे आणि दोन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

Your Comments
Post Comments