Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय. मुंबईत एकाचा, पुण्यात चौघांचा तर नाशिरकमध्ये तिघांचा मृत्यू झालाय. तर बेळगावमध्येही मिरवणुकीतल्या चौघांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
मुंबईत सायनमध्ये विसर्जन मिरवणुकीच्यावेळी एका ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली. मुलाच्या तोंडात बाप्पाचा प्रसाद तसाच होता. मुलाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. निफाड तालुक्यात विसर्जनासाठी गेलेले तिघे पाण्यात बुडाले. तर बेळगावमध्येही मिरवणुकीतल्या चौघांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.