मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.

दरम्यान या प्रकरणी राजनाथ सिंह आज लोकसभेत वक्तव्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशीची घोषणा होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

याआधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनीही जनभावना लक्षात घेऊन अपघाताची सीबीआय तपास करण्याची मागणी केली होती. याशिवाय परळीकरांनीही सीबीआय चौकशीची मागणी करत मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना घेराव घातला होता.

भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली होती. `मुंडे दिल्लीहून बीडला येण्यासाठी विमानतळाकडे जात होते. सकाळी सहा- साडेसहा वाजता दिल्लीत इतकी गर्दी नसते. रस्त्त्यांवर ट्रॅफिक कमी असतं. त्यामुळं या अपघाताबाबत शंका येते,` असं शेंडगे यांनी म्हटलं होतं.

गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी अपघाती मृत्यू झाला होता. दिल्ली विमानतळाच्या दिशेनं जाणाऱ्या मुंडेंच्या गाडीला एका इंडिका कारनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. अंतर्गत रक्तस्त्रावामुळं मुंडेंचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.







* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 11:25
First Published: Tuesday, June 10, 2014, 11:25
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?