मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 11:25

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.

मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी – उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 16:36

लोकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हणत या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे केली आहे. परळीत गोपीनाथ मुंडेच्या अंत्यविधीसाठी उद्धव ठाकरे आले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

बंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी

Last Updated: Friday, May 9, 2014, 12:02

पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.

भंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा

Last Updated: Friday, March 1, 2013, 15:19

भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.

एनडीए घोटाळा; सीबीआय चौकशी सुरू

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 19:21

पुण्यातील एनडीए म्हणजेच ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’तील नोकर भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज आरोपपत्र?

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 12:17

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयने दोन आठवड्यापूर्वी न्यायालयाला दहा दिवसांत आरोप पत्र दाखल करु अशी हमी दिली होती.

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...

Last Updated: Friday, June 22, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

Last Updated: Saturday, February 4, 2012, 12:11

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.