Last Updated: Thursday, December 20, 2012, 11:50
www.24taas.com, शिमलाहिमाचल विधानसभेच्या मतमोजणीत सुरूवातीला काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली असून सकाळी साडे ११ वाजता आलेल्या कलांनुसार काँग्रेस ३९, तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे.
त्यामुळे हिमाचल काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे. जनतेने भाजपला नाकारले आहे आणि काँग्रेसला स्वीकारल्याचे चित्र दिसत असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले.
यातील २ जागा भाजपने जिंकल्या असून २३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने १ जागेवर विजय मिळवला असून ते ३९ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला गेल्या विधानसभेच्या तुलने १८ जागांचे नुकसान आहे. तर काँग्रेसला १६ जागांचा फायदा आहे. भाजपच्या २ जागा अपक्षांच्या पारड्यात पडलेल्या दिसतात.
सत्ताधारी भाजपला काँग्रेसने धोबीपछाड केल्याचे चित्र दिसत आहे.
First Published: Thursday, December 20, 2012, 11:49