Last Updated: Thursday, December 20, 2012, 14:54
www.24taas.com, अहमदाबादमुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिनगर या त्यांच्या मतदार संघातून ८६,३७३ मतांनी विजयी झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार निलंबित पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी श्वेता भट्ट यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे.
६२ वर्षीय मोदी गुजरातमध्ये २००१पासून राज्य करीत आहेत. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची सत्ता संभाळली होती. त्यांनी २००७ मध्ये गुजरातची कमान हाती घेतली.
सर्वाधिक काळ राज्य चालविण्याचा मान नरेंद्र मोदींकडे जातो. याच वर्षी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना २,०६३ दिवस पूर्ण केलेत. २००७ मध्ये ते दुसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी पाठिमागे वळून पाहिले नाही. भाजपची घौडदौड सुरूच राहिली आहे.
First Published: Thursday, December 20, 2012, 13:29