Last Updated: Thursday, December 20, 2012, 17:10
www.24taas.com, मुंबईगुजरातमधील नरेंद्र मोदींचा विजय हा ऐतिहासिक असुन त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी विकासही करून दाखवला आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस जमीनदोस्त होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राने त्यांच्या विजयापासून धडा घ्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एकहाती सत्ता दिल्याने गुजरातचा विकास सहज शक्य झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही एकहाती सत्ता दिल्यास महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख नक्कीच चढता राहील अशी आशा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
First Published: Thursday, December 20, 2012, 17:01