Last Updated: Thursday, December 20, 2012, 18:52
अहमदाबादमध्ये विजयानंतर नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले. भाषणात मोदींनी गुजराती बांधवांचे जाहीर आभार मानले. तसंच विरोधक आणि मीडियावर मात्र खोचक टोमणे मारले. या भाषणात विकासाचेच मुद्दे मांडून मोदींनी विकासाचं राजकारण करत असल्याचं दाखवून दिलं. तसंच पंतप्रधानपदाच्या दावेदारीबद्दलही पुसट संकेत दिले आहेत.
पैसे हरले, परिश्रम जिंकले लोकशाहीमध्ये गुजरातचे मतदार परिपक्व झाले असून त्यांनी लालचीपणाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. जेव्हा माझ्या गुजरातचा विकास होईल, तेव्हा माझाही विकास होईलच, असा विश्वास त्यांना जाणवू लागला.
८० च्या दशकातील जातीयवादाची पुनरावृत्ती होणार नाही. येणाऱ्या पीढीचा विचार करण्यास गुजरात्यांनी सुरूवात केली आहे. कित्येक वर्षं दर पाच वर्षांनी सरकार येई जाई. मात्र आता जनता सरकारकडून त्यांच्या कामाचं उत्तर मागतं. त्यामुळे सरकारची जबाबदारी वाढते. खोट्या आमिषांना न भूलता त्यांनी मतदान केलंय. आजचे हिरो माझे ६ कोटी गुजराती बांधव आहेत. गुजरातने आपल्या रूपात देशासमोर एक उदाहरण ठेवलं आहे. देशाच्या नागरिकांनी उत्तम प्रशासन आणि विकासासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे.
सामान्य जनतेचr इच्छापूर्ती हीच लोकशाहीची गरज गेल्या ११ वर्षांत काही कठोर निर्णयही घ्यावे लागले. सरकारी कर्मचारी मोदींच्या कामावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. पण आज दिसून आलं की सरकारी कर्मचारीही माझ्याबरोबरच असल्याचं आज निवडणुकीत सिद्ध झालं आहे.
मला कधीच कुणावर वौयक्तिक टीका करण्याची गरज पडली नाही. प्रत्येकाचा मी आदर करतो. माझ्यावर संस्कार बालपणापासून जे संस्कार झाले आहेत, त्यांना कधी तडा जाऊ देणार नाही.
जनता-जनार्दन ईश्वराचंच एक रुपमाझी काही चूक झाली असेल, तर माझ्या ६ कोटी गुजराती बंधू भगिनींची क्षमा मागतो. आता नवं युग सुरू झालं आहे. पुढील पाच वर्षंदेखील मी जनतेला संपूर्ण समर्पित असेन. मी जनतेसाठी काम करेन. मी जनतेला ईश्वर रूप मानतो. आज मी व्यक्तिगत रुपात काही मागत आहे. तुम्ही मला सत्ता दिलीत, आणि पुढेही माझ्याकडून कुठली चूक होऊ नये, माझ्या हातून कुणाचं वाईट घडू नये यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या. देशाच्या विकासासाठी ततडफडणाऱ्या लोकांचा हा विजय आहे. भारतमातेच्या भल्यासाठी झगडणाऱ्या लोकांमुळेच आजचा विजय मी संपादन करू शकलो. आज मी पार्टीच्या लक्षावधी कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक आहे. मी गुजरात खूप खूप पुढे घेऊन जाईन.गरीब, पीडीत, शोषित, शेतकरी वर्ग विकासाच्या मार्गावर चालतील, यासाठी मी काम करेन. दररोज मी एक नवं काम केलं नाही, तर मला शांतता लाभत नाही.
गुजरातचा विजय पचत नाहीगुजरातमध्ये बरेच टीव्ही पंडीत माझा विजय पचवू शकत नाहीत. मीडियामध्ये गुजरात विरोधी टोळी आहे. त्यांच्यासाठीही जरा प्रार्थना करा. आमचा विजयच झाला आहे. ही मॅच ड्रॉ झालेली नाही. ज्यांना ही गोष्ट पटत नाही, त्यांची मला दया येते.
ज्या लोकांना भाजप जिंकू नये असं वाटत होतं, ते तारस्वरात खोटं बोलत होते. मात्र मतदारांनी या सर्वांमधून माझं समर्थन करणं, म्हणजे कापसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं आहे. यासाठी मी मतदारांना साष्टांग दंडवत घालावसं वाटतं.
माझ्याविरोधात अत्यंत घाणेरडी भाषा वापरली गेली. पण, जेवढा तुम्ही चिखल उडवाल, तेवढंच कमळ जास्त फुलेल. जेवढे दगड लोकांनी मला मारले, त्यांची मी शिडी बनवली. लोकांचा विश्वास आणि माझा आत्मविश्वास एकत्र येऊन भव्य गुजरातची निर्मिती करेल. येणारी पाच वर्षं आपत्तीमुक्त असतील. आता मला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. आता मला तुमच्या अपेक्षांवर खरं उतरायचं आहे. जर तुमची इच्छा असेल, तर १ दिवसासाठी २७ तारखेला दिल्लीला जाऊन येईन. असं म्हणत आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. मा आजही भारतमातेची सेवा करत आहे. मी गुजरातची सेवा करण्यात आनंद मानतो. मी भाजप पक्षाचा लहानसा भाग आहे.
निवडणुकीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर आम्ही केला. ‘या आणि गुजरातमधील तंत्रज्ञानाचा अभ्यास करा’ असं आवाहन देशातील तरुणांना मोदींनी केली आहे. आता मी थांबणार नाही. आता तुमची स्वप्नं पूर्ण करणार. असं अश्वासन नरेंद्र मोदींनी गुजराती जनतेला दिलं.
First Published: Thursday, December 20, 2012, 18:02