तेलकट, तळलेले पदार्थ खल्ले तर...,if you eat oily foods for breakfast then ...

तेलकट, तळलेले पदार्थ खल्ले तर...

तेलकट, तळलेले पदार्थ खल्ले तर...
www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अलिकडे कामाच्या व्यापात किंवा वेळ वाचवण्यासाठी बहुतांश लोक नाश्ता करत नाहीत आणि केला तरी ते फास्टफूड खातात. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. आहारतज्ज्ञांनुसार दिवसाची सुरुवात करतांना तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानीकारक आहे.

गाजियाबादमधील कोलंबिया एशिया दवाखान्यातील आहारतज्ज्ञ अंबिका शर्मा यांनी नाश्त्यात खाणे योग्य नसलेल्या काही पदार्थांची यादी बनवली आहे. त्यानुसार तेल अथवा तुपाचे पराठे तर बिल्कुलच खाऊ नयेत. जर खायचे असल्यास त्यांच्यावर पुन्हा तेल अथवा तुप लावू नये आणि त्यासोबत दही जरूर खावे.

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरी भाजी खाणं स्वाभविक आहे. मात्र, हे स्वास्थासाठी योग्य नाही. पुरी खाण्याअगोदर ती पेपरवर ठेऊन अतिरिक्त तेल शोषलं जाईल हे बघावे, जंकफूड जसे चिप्स, चॉकलेट, टॉफी आदी पदार्थाचे सेवन करू नये.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013, 11:28


comments powered by Disqus