Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:33
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीतुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.
लिंबू पाणी खूप गुणकारी आहे. लिंबू पाणी आरोग्यवर्धक आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आहे. तसेच मिनरल्सची मात्रा जास्त आहे. तसेच प्रोटीनबरोबर कार्बोहायड्रेट, शर्कराही आहे. थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन-ई यांचीही काहीप्रमाणात मात्रा आहे.
लिंबू सर्वाधिक गुणकारी असून वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. लिंबू पाणी पिताना (बिना साखर) कॅलरीज फ्री असतात. कमी कॅलरीजचे पाणी पिताना शरीराला ऊर्जा मिळते. जितके तुम्ही जास्त पाणी प्याल तितके तुमच्यासाठी ते फायदेशीर असते.
रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तुम्ही दिवसातून अनेकवेळा लिंबू पाणी प्यायले तरी चालू शकते. मात्र, एक ग्लास लिंबू पाणी प्राशन केले तर ते अधिक चांगले आहे. लिंबातील व्हिटॅमिन सी असल्याने आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी, लिंबू आणि मध एकत्र करुन घेतले तर तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू पाणी अनावश्यक मात्रा शरीराबाहेर फेकण्यास मदत करते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 15:33