Last Updated: Monday, December 30, 2013, 18:20
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.
पुढील तीन महिने प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला २० हजार लिटर पाणी देण्यात येणार असून याचा खर्च दिल्ली जल बोर्ड उचलणार आहे. मात्र ज्यांच्याकडे पाण्याचं मीटर आहे त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे.
दिल्लीत पाणी मीटर असलेल्या घरात कुटुंबाला तीन महिने रोज ६६६ लिटर पाणी मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आजारी असतानाही घरी बोलावलेल्या बैठकीत त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 18:16