केजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमीAAP`s New Year gift to Delhiites - electricity

केजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी

केजरीवालांनी पूर्ण केलं दुसरं आश्वासन, वीज दर ५०% कमी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पुर्तता करण्याचा धडाका लावलाय. मोफत पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर केजरीवालांनी आता स्वस्त वीज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

नवीन वर्षाच्या निमित्तानं दिल्लीकरांना ही दुसरी अनोखी भेट केजरीवालांनी दिलीय. दिल्लीतल्या वीज दरात तब्बल ५० टक्के वीज कपात करण्याची घोषणा करण्यात आली असून उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

० ते ४०० युनिटपर्यंत पुढील तीन महिने ५० टक्के दर आकारले जाणार आहेत. दिल्लीतल्या २८ लाख ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कालच केजरीवाल यांनी मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा केली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 19:46


comments powered by Disqus