Last Updated: Wednesday, August 21, 2013, 09:29
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्लीभारतात दहशत पसरवणारा पाकिस्तानी जहाल अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याचे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात थोबाडच फोडले. भारतीय तुरुंगातून सुटका होताच आपण पुन्हा दहशतवादी हल्ले करणार असे सांगत टुंडाने नुकतेच भारताला आव्हान दिले होते.
टुंडा याला काल न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणण्यात आले तेव्हा हिंदू सेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी टुंडाला कानफटवले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. बॉम्ब तयार करणारा अतिरेकी टुंडा याच्या नेपाळ-बांगलादेश सीमेवर दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
अतिरेकी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टुंडाला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यामुळे काल टुंडाला पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी न्यायालयाच्या परिसरातच हिंदू सेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी टुंडावर हल्ला केला आणि चांगले चोपले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 09:29