Last Updated: Sunday, August 18, 2013, 13:12
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळलीय. ‘सामना’तल्या संपादकीयमधून त्यांनी मोदींची स्तुती केलीय. “जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ते माफिया डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणतील आणि त्याला फाशीवर लटकवतील”, असा शिवसेनेला वाटतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर ज्या मुद्द्यांवर मोदींनी टीका केली, त्यासर्व समस्यांवर मोदी उपाय करतील, अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
ठाकरे संपादकीयमध्ये म्हणाले, “मोदी जर दिल्लीत सरदार पटेल यांच्यासारखं सत्तेत येतील, तर ते पाकिस्तानात लपून बसलेले हाफिज सईद, दाऊट इब्राहिम आणि टायगर मेमनला तिथून खेचून आणतील आणि त्यांना फाशी देतील. मालवाहू विमानांमधून स्विस बँकेत असलेला काळा पैसा ते भारतात आणतील. गरीब आणि शेतकरी त्यामुळं आनंदी होऊन कर्ज मुक्त जीवन जगतील. सोबतच रुपयाची किंमत जशी घसरतेय त्याच्या विरुद्ध परिणाम मोदी पंतप्रधान झाल्यावर दिसतील”.
उद्धव म्हणाले, “आम्हांला विश्वास आहे, मोदी सत्तेत आल्यावर पाकिस्तान आपल्या देशाची सीमा पार नाही करणार आणि आपल्या सैन्यांची हत्याही करणार नाही. सिंधुरक्षक सारख्या आपल्या पाणबुडीत आगही लागणार नाही, मोदी हे सर्व करुन दाखवतील, यात आम्हाला शंका नाही”.
मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस पक्षाची झोप उडाली असून, काँग्रेसच्या नेत्यांनी झोपेच्या गोळ्यांची ऑर्डर दिली असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 18, 2013, 13:01