Last Updated: Tuesday, March 19, 2013, 15:42
www.24taas.com, नवी दिल्लीबुकर पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी हा भारतीय लोकशाहीवरील कलंक असल्याचं अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.
‘द हँगिंग ऑफ अफझल गुरू’ या पुस्तकात अरुंधती रॉय यांनी अफझल गुरूची बाजू घेत भारत सरकारवर टीका केली आहे. अफझल गुरूने संसदेवर केलेल्या हल्ल्याला लोकशाहीवरचा हल्ला असल्याचा मीडियाने अपप्रचार केला होता, असं अरुंधती रॉय यांचं म्हणणं आहे.
अफझल गुरूला फाशी घाई घाईत आणि गुप्तपणे देण्यात आली. गुरूच्या कुटुंबाला याविषयी आधी कुठलीही माहिती दिली गेली नाही. त्याचं शवही गुपचुप पुरण्यात आलं. याबद्दलही अरुंधती रॉय यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
First Published: Tuesday, March 19, 2013, 15:42