केजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा, Kejriwal forms ‘Aam Aadmi Party’, says party’s vision is Swaraj

केजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा...

केजरीवाल यांनी केली ‘आम आदमी पार्टी’ची घोषणा...
www.24taas.com, नवी दिल्ली

अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पार्टीची आज झालेल्या बैठकीनंतर घोषणा करण्यात आलीय. ‘आम आदमी पार्टी’ असं या नव्या राजकीय पक्षाचं नामकरण करण्यात आलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास ३०० संस्थापक सदस्यांच्या उपस्थितीत ‘कन्स्टिट्युशन क्लब’मध्ये आजची बैठक पार पडली. या बैठकीत केजरीवाल यांनी पक्षाच्या नावाचा प्रस्ताव अन्य सदस्यांसमोर ठेवला आणि इतर सभासदांनीदेखील या नावाचा स्वीकार केला. यावेळी पक्षाचं वेगळं असं संविधानही सदस्यांनी स्वीकारलंय. केजरीवाल यांचे जुने सहकारी मयांक गांधी यांनी पक्षाची घटना या बैठकीत मांडली. चंद्रमोहन यांनी अनुमोदन दिल्यानंतर घटना संमत करण्यात आली.

दिल्लीत झालेल्या या बैठकीत पक्षाची भावी रुपरेषा आणि वाटचाल यावरही चर्चा झाली. प्राधान्यानं हाती घेतले जाऊ शकतात, अशा २५-३० विषयांवर चर्चा झाली. आता यातल्या महत्त्वाच्या विषयांवर समित्यांची स्थापना करण्यात येणार असून येत्या चार-पाच महिन्यांत कारवाईचा मसुदा निश्चित होईल. त्यानंतर त्यावर देशभर चर्चा घडवून आणली जाईल.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं राजकारणात शिरून या आंदोलनाला पुढे न्यावं, अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती. याच मुद्द्यावर १९ सप्टेंबर रोजी अन्ना हजारेंशी मतभेद झाल्यानंतरही ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. त्यानंतर केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली होती. पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येतंय. १९४९ साली याच दिवशी देशाची राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. ‘आम आदमी’, स्त्रिया आणि तरुण यांचा हा पक्षं असेल, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

First Published: Saturday, November 24, 2012, 17:45


comments powered by Disqus