Last Updated: Sunday, September 1, 2013, 19:00
www.24taas.com, झी मीडिया, जोधपूरअल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूंना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. जोधपूरच्या कोर्टाने ही कोठडी सुनावलीय. त्यामुळे आसाराम बापूंना रविवारची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे.
बापूंना कोर्टात हजर करताना गोंधळांचं वातावरण निर्माण झालं होतं... यावेळी चेंगराचेंगरीही झाली.. शिवाय पोलिसांची जिप्सीही पलटी झाली. इंदूरच्या आश्रमातून शनिवारी अटक केल्यानंतर विमानानं आधी दिल्लीत आणि त्यानंतर जोधपूर इथं आणण्यात आलं. राजस्थानातल्या जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक शोषणाचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडित मुलीनं याप्रकरणी दिल्लीत तक्रार केली होती. नंतर ती तक्रार जोधपूरला वर्ग करण्यात आली.
जोधपूर न्यायालयानं शरण येण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर आसाराम बापूंवर अटकेची कारवाई झाली. आता कोर्टानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने आसाराम बापूंना रविवारची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 1, 2013, 19:00