आसाराम बापू संकटात, पोलिसांचं समन्स!, Asaram Bapu summoned in sexual abuse case

आसाराम बापू संकटात, पोलिसांचं समन्स!

आसाराम बापू संकटात, पोलिसांचं समन्स!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू संत आसाराम बापू अधिक संकटात सापडतांना दिसतायेत. जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना चौकशीसाठी बोलावलंय.

जोधपूर पोलिसांनी समन्स जारी करुन चार दिवसांच्या आत पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश आसाराम बापू यांना दिले आहेत. ३० ऑगस्टपर्यंत ते पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांना अटक केली जावू शकते, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. जोधपूर पोलीस आज अहमदाबादमध्ये आसाराम बापूंना नोटीस बजावणार आहे.

आसाराम बापू यांनी जोधपूरमधील आश्रमात एका अल्पवयीन मुलींनं आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय. त्यासंबंधी १९ ऑगस्टला तिनं आपल्या वडिलांसोबत जावून दिल्लीतल्या कमलानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यांनंतर आसाराम बापू विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 09:24


comments powered by Disqus