Last Updated: Monday, August 26, 2013, 10:06
www.24taas.com , झी मीडिया, इंदोर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेले संत आसाराम बापू रविवारी पहिल्यांच सगळ्यांच्या समोर आले. पहासात्मक शैलीत त्यांनी सर्वांसमोर आपल्यावरील आरोप स्विकारले. मात्र लगेचच त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचं म्हणत लवकरच सत्य समोर येईल, असंही म्हटलंय.
इंदोरला आश्रमात आयोजित एका कार्यक्रमात आसाराम बापू बोलत होते.“सत्य समोर येईल, मी भारतीय संस्कृतीचा प्रचार करतो, म्हणूनच माझ्याविरुद्ध कट रचला गेलाय”, असंही आसाराम बापू म्हणाले.
मागील चार वर्षांपासून विविध आरोप आसाराम बापू यांच्यावर लावण्यात आले आहेत. मात्र त्यातला एकही आरोप सिद्ध होवू शकला नाही. हे आरोप बेडकं पावसाळ्यातच लावतात, असं म्हणत स्वत:ला त्यांनी निर्दोष असल्याचं म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 10:06