Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56
www.24taas.com, झी मीडिया, इंफाळआसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान, या सर्व हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्य़ांतील हजारो स्थलांतरितांनी पलायन केले आहे. कोक्राझार आणि बक्सा हे दोन्ही जिल्हे भूतान आणि बांगलादेश या देशांच्या सीमावर्ती भागात आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ांत सातत्याने घुसखोरी होत असते.
या घुसखोरीला येथील स्थानिक बोडो आदिवासींनी कायमच विरोध केला आहे. त्यामुळे येथे सातत्याने स्थलांतरितांना लक्ष्य केले जात असते.
गुरुवारपासून सुरू झालेला हिंसाचार हा त्याचाच भाग आहे. गेल्या दोन दिवसांत या दोन्ही जिल्ह्य़ांतील गावांत नॅशनल डेमॉक्रॅटिक बोडोलँड फ्रंट या संघटनेच्या दहशतवाद्यांनी स्थलांतरितांवर बेछूट गोळीबार करण्याचे सत्र चालवले आहे.
त्यात आतापर्यंत ३२ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, हिंसाचारामुळे दहशतीच्या सावटाखाली या दोन्ही जिल्ह्य़ांतील सुमारे पाच हजार स्थलांतरितांनी येथून पलायन केले असल्याचे समजते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 4, 2014, 16:56