फेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!, Because the fecal boiling water anaphrenda o

फेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!

फेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून अनफ्रेंड केल्यावरून संतप्त झालेल्या बिहारमधील एका युवकाने एका मुलीच्या चेहर्यानवर उकळते पाणी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित मुलगी २० टक्के भाजली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील गन्नीपूरमध्ये राहणार्याआ आठव्या इयत्तेतील एका मुलीच्या चेहर्यानवर एका तरुणाने उकळते पाणी फेकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईसमक्ष त्याने हा प्रताप केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित मुलाविरोधात तक्रार नोंदवली आहे.

संबंधित युवक मुलीच्या वडिलांकडे शिकवणीसाठी यायचा. त्यानंतर त्याने शिक्षकाच्या मुलीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. शिकवणीतील मुलाची वागणूक योग्य वाटल्यामुळे तिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली, मात्र त्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जखमी मुलीने त्या तरुणास फेसबुकवरून अनफ्रेंड केले.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 18:39


comments powered by Disqus