Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:09
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.
माहिताच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्याकडे अशी कोणतीही नोंद नाही की ज्याने हे सिद्ध होते की भगत सिंह यांना शहीद घोषित करण्यात आले होते.
दुसरीकडे भगत सिंह यांचे नातू यादवेंद्र सिंह यांनी भगत सिंह यांना शहीद दर्जा मिळण्यासाठी एक अभियान सुरू करण्याचा विचार केला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात मंत्रालयाला विचारण्यात आले की, भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना केव्हा शहीद घोषित करण्यात आले. मे मध्ये मंत्रालयाकडून आलेल्या उत्तरात म्हटले आहे की या तिघांना शहीद म्हणून सिद्ध करणारा कोणताही दस्तऐवज किंवा नोंद त्यांच्याकडे नाही. भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या जेलमध्ये फाशी देण्यात आली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 17, 2013, 21:09