भाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी BJP, congress on Sushil kumar`s statement

भाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी

भाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी
www.24taas.com, नवी दिल्ली

हिंदू दहशतवादासंदर्भात सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं विधान आता चांगलंच तापू लागलंय. भाजप-आरएसएस विरुद्ध काँग्रेस या संघर्षाला जोर चढलाय. शिंदेंच्या वक्तव्यावर आर. माधव यांनी जोरदार टीका केली. तसंच सुशीलकुमार शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दुसरीकडे भाजपनंही सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवलाय. हाफिज सईद त्याच्या सुटकेसाठी सुशीलकुमार शिंदेंच्याच वक्तव्याचा आधार घेईल, असं भाजपनं म्हंटलं आहे

आरएसएस आणि भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत असताना काँग्रेसकडून मोर्चा सांभाळला तो दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांनी. सुशीलकुमार शिंदेचं वक्तव्य योग्यच असून काँग्रेस आणि सरकार त्यांच्या पाठिशी असल्याचं विधान या नेत्यांनी केलं आहे.

राजकारणाच्या पटावर प्रत्येक पक्ष दहशतवादाला आपापल्या नजरेतून पाहतोय. पण दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो आणि जात नसते. त्यामुळे दहशतवादाविरोधात सगळ्या देशानं एकजूट होण्याची सगळ्यात जास्त गरज आहे.

First Published: Monday, January 21, 2013, 16:52


comments powered by Disqus