सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत Maharashtra ashamed of Sushilkumar- Raut

सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत

सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत
www.24taas.com, मुंबई

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू अतिरेकी बनवण्याची प्रशिक्षण केंद्रं चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केला होता.

हिंदू आतंकवादावर सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर शिवसेना आपल्या मित्रपक्षाच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. शिंदे हे महाराष्ट्रातले असल्याची लाज वाटते, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. उगीच बडबड न करता काँग्रेसनं पुरावे द्यावेत. उलट काँग्रेसनंच दहशतवादाला खतपाणी घातलंय, असं राऊत म्हणाले.

भाजपच्या अन्य नेत्यांनीही शिंदे यांच्या या वक्तव्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. हे विधान बेजबाबदार असल्याचं शहनवाज हुसेन यांनी म्हटलंय. तर बिहारमधले भाजप नेते गिरीराज सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वानं आपल्या अन्य नेत्यांना शब्दांचा वापर कसा करायचा, ते शिकवायला हवं, असं म्हटलंय.

First Published: Sunday, January 20, 2013, 19:04


comments powered by Disqus