राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!, Case against Anna Hazare for showing `disrespect` to National Flag

राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!

राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!
www.24taas.com , झी मीडिया, जौनपूर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.

अमेरिकेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. मात्र इकडे उत्तरप्रदेशातील जौनपूरमधील स्थानिक कोर्टानं अण्णांविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कायद्यानुसार सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज
फडकवल्यानंतर त्याला सूर्यास्तापूर्वी खाली उतरवणं आवश्यक असतं. तसं न केल्यास तो राष्ट्रध्वजाचा अवमान ठरतो.

श्रीवास्तव यांनी स्थानिक कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीनुसार २९ जुलै रोजी ‘जनतंत्र यात्रे’वर निघालेल्या अण्णा हजारेंच्या इनोव्हा गाडीच्या बोनेटवर राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. त्यानंतर टीडी महाविद्यालयातील ही जनसभा रात्री ८पर्यंत सुरु होती. गाडीवरील ध्वज सूर्य मावळल्यानंतरही उतरवण्यात आला नव्हता. हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचं तक्रारदारानं म्हटलंय. त्यामुळं कोर्टानं या प्रकरणाची दखल घेत शनिवारी लाईन बाजार पोलीस ठाण्यात अण्णा हजारेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

“आमचं अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्यानंच आम्ही टीडी महाविद्यालयात झालेल्या अण्णांच्या जनसभेमध्ये सहभागी झालो होतो. मात्र तिथं राष्ट्रध्वजाचा अवमान पाहून आमच्या भावना दुखावल्या गेल्यानं आम्ही अण्णाविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केली होती”, असं मत वकिलांनी व्यक्त केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 18, 2013, 14:04


comments powered by Disqus