सुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खुणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट`Deep bite` mark found on Sunanda Pus

सुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट

सुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असलेली माहिती म्हणजे सुनंदाच्या दोन्ही हातांवर अनेक जखमा असून चावा घेतल्याचीही खूण आहे.

या दरम्यान, पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांचे पती आणि केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनाही तपासात सहभागी होण्यासाठी सांगू शकतात. मॅजिस्ट्रेटनं या हत्येचा हाय प्रोफाईल प्रकरणाची हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

सुनंदा यांच्या हातांवर खूप जखमा असून त्यांच्या उजव्या गालावरही जखम असल्याचं पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आलंय. मात्र या जखमांमुळं सुनंदा यांचा मृत्यू झाला नसल्याचंही त्यात सांगण्यात आलंय. एम्समध्ये सुनंदा यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूला `अचानक आणि अनैसर्गिक` म्हटलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलम १६० अंतर्गत शशी थरूर यांच्यासह ११ जणांची चौकशी पोलीस करण्याची शक्यता आहे. या ११ जणांमध्ये सुनंदा यांचा भाऊ आणि मुलाचाही समावेश आहे.

दरम्यान, सुनंदा पुष्कर यांचा मुलगा २१ वर्षीय शिव मेनन हा त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. शिव मेनननं आपल्या आईचा शशी थरूर खून करू शकत नाही, असं म्हटलंय. त्या दोघांमध्ये प्रेम होतं. थरूर कोणत्याही प्रकारे सुनंदा यांना शारीरिक इजा पोहोचवू शकत नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 11:48


comments powered by Disqus