Last Updated: Saturday, December 29, 2012, 08:02
www.24taas.com, सिंगापूरदिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरलीय. शुक्रवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. पीटीआयनं हे वृत्त दिलंय. गेल्या 13 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. आधी दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर सिंगापूरमधल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. तिचे काही अवयव निकामी झाले होते. तसंच रक्त तयार होण्यातची अडचणी होत्या. तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं तिच्या नातेवाईकांना तिच्याजवळ राहण्यास डॉक्टरांनी सांगितल होतं. तरुणीच्या मेंदूलाही दुखापत झाली होती. तसंच शरीरातील जंतूसंसर्गही खूपच वाढला होता. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.
दरम्यान, पीडित मुलीच्या मृत्यूनंतर दिल्लीतली सुरक्षा वाढवण्यात आलीय. जनतेनं शांतता पाळावी असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलंय. पीडित मुलीवर बलात्काराचं प्रकरण उघड झाल्यावर दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं.
First Published: Saturday, December 29, 2012, 07:53