बलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना, delhi rape, manoj kumar

बलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना

बलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना
www.24taas.com, नवी दिल्ली

पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज कुमार याला कठोर शिक्षा ठोठावून द्याला फाशीच द्या, अशी मागणी त्याची पत्नी अर्चना देवा हिने केली आहे.

मनोज कुमार दोषी असेल, तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे अर्चना देवी हिने म्हटले आहे. पाच वर्षांच्या बालिकेवर असे कृत्य करणाऱ्याला जगण्याचा काहीच अधिकार नाही. मनोज कुमारच्या सासू सासऱ्यांनीही त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

तिहार कारागृहात रविवारी रात्री मनोजला कैद्यांकडून मारहाण करण्यात आली. तिहारमधील कैद्यांनी एकत्र येत माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या मनोजला मारहाण केली. अखेर सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत मनोजला कैद्यांपासून वाचविले. तिहारमधील जेल नंबर आठमध्ये मनोजला ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीतील तीन मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. या बालिकेवरील बलात्काराच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून तीन मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात आली आहेत. रेस कोर्स, उद्योग भवन आणि केंद्रीय सचिवालय या तीन मेट्रो स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.

First Published: Monday, April 22, 2013, 13:42


comments powered by Disqus