दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला न्यायालयीन कोठडी , Delhi rape: Second accused arrested from Bihar

दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी

दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.

बिहारमधून त्याला दिल्लीत आणल्यानंतर पोलीस उपायुक्तांच्या ऑफिसमध्ये त्याची चौकशी सुरु होती. ओळख परेडनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

दिल्लीत चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर आंदोलन सुरूच आहे. ७ रेसकोर्स रोड येथील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू असताना बळजबरीनं आंदोलकांना बळजबरीनं हटवण्यात आलं.

आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच सुरक्षा वाढवण्यात आली होती. रात्री उशिरासुद्धा पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली.

First Published: Monday, April 22, 2013, 08:21


comments powered by Disqus