Last Updated: Tuesday, April 16, 2013, 17:19
www.24taas.com, नवी दिल्लीआज संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.या भूकंपामध्ये इराणमध्ये कमीत कमी ३७ लोकांचे प्राण गेल्याचे आणि८५० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या भौगोलिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल एवढी आहे. या भूकंपाचं केंद्र पाकिस्तान-इराण सीमेवरआहे. इराणमधील खाशपासून ८६ किलोमीटर अंतरावर १५.२ किलोमीटर खोल या भूकंपाचं केंद्र आहे.
उत्तर भारताला या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दिल्ली, हरीयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्ये या भुकंपाचे धक्के जाणवले.
First Published: Tuesday, April 16, 2013, 16:52