Last Updated: Thursday, October 24, 2013, 10:26
www.24taas.com , वृत्तसंस्था, रायपूरउत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडा सध्या खूप चर्चेत आहे. राजा राव रामबक्श सिंग यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं शोधण्यासाठी मागील ६ दिवसांपासून उत्खनन सुरू आहे. आता एक नवा शोध लागलाय की, डौडिया खेडा इथल्या राजवंशाचा संबंध छत्तीसगढ सोबत आहे.
अनेक वर्षांपूर्वी डौडिया खेडा राजवंशातील सदस्य राजा केसरी सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपलं काही जुनं सामान घेवून छत्तीसगढला आले होते. तेव्हा छत्तीसगढमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. सध्या छत्तीसगढच्या राजिमपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जौंदा गावात याच राजवंशातलं एक कुटुंब राहतंय.
मिळालेल्या माहितीनुसार रायपूरच्या लोहार चौकातील शासकीय कन्या सरस्वती विद्यालय परिसरात राजा केसरी सिंह यांनी मोठा वाडा बांधला होता. राजा केसरी सिंह रायपुरमध्ये लोखंडाचा आणि मिष्टान्नाचा व्यवसाय करत होते. त्यांनी भाठागांव जवळून जाणाऱ्या खारुन नदीच्या तीरावर आंब्याचे अनेक झाडंही लावले. आजही त्या आंब्याच्या बागेला राजा केसरीच्या नावानं ओळखलं जातंय.
राजा केसरीनं राजिमच्या जौंदा गावाला विकत घेतलं होतं. गावात त्यांचे वंशज आजही राहतात. सध्या राजा केसरीची सहावी पिढी जौंदा गावात राहतेय. १४व्या शतकात राजवंशातले लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकत्र राहायचे... त्यामुळंच आजही रायपुरच्या जुनी वस्ती, बुढापारा, लोहार चौकसह अनेक भागांमध्ये राजा-महाराजांच्या जमान्यातले अनेक वाडे बघायला मिळतात.
आता या राजवंशातल्या लोकांचंही लक्ष डौडिया खेडातल्या सोन्याकडे लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 24, 2013, 10:26