Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:29
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपली बचत खाती बॅंकेप्रमाणे उपलब्ध करणार आहे. बँकेप्रमाणे आपली पीएफ बचत काढण्याची सुविधा देण्याचा विचार आहे. या संघटनेची बँकेप्रमाणे कार्यप्रणाली करण्याचे उद्दिष्ट आहे. संघटनेच्या सर्व 120 कार्यालयांचे संगणकीकरण पूर्ण झालेय.
आता बँकांप्रमाणेच कोअर सुविधा देण्याच्या दृष्टीने तांत्रिक बदल सुरू आहे. यामुळे सभासदांना युनिक आयडेंटिटी नंबर देणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पीएफ नंबर पोर्टेबिलिटी सुविधाही सुरू करता येईल. यातून या खात्याच्या सर्व सुविधा बँक खात्याप्रमाणेच होतील, सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
याचा लाभा 5 कोटी सभासदांना बँकेप्रमाणेच सुविधा मिळू शकेल. यामुळे संबंधितांना एटीएममधून आपली ठेव हवी असेल तेव्हा काढून घेणे शक्य होणार आहे. येत्या एक ते दीड वर्षात सभासदांना एटीएम सेवा देण्याचा विचार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 12:24