Last Updated: Sunday, December 15, 2013, 20:41
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीसरकारी लोकपाल बिल अण्णांनी संमत केलं असलं, तरी आम आदमी पार्टीनं या बिलाला आपला विरोध दर्शवलाय.
लोकपाल बिलाअंतर्गत सीबीआयला स्वायत्तता देण्याची मागणी सुरवातीपासून करण्यात येत आहे. पण सरकारी लोकपाल बिलात ती मागणी मान्य करण्यात आलेली नाही.
सरकारी लोकपाल संमत झालं तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्याखाली एखादा मंत्री सोडाच एखादा उंदीरही पकडता येणार नाही अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 15, 2013, 20:41