Last Updated: Thursday, January 10, 2013, 12:59
www.24taas.com, नवी दिल्ली पाकिस्तानच्या हल्ल्लात पूँछमधल्या मेंढरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबतीत एक नवा खुलासा झालाय. या हल्ल्यामागे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिज सईदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या हल्ल्यात दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांचे शिर धडावेगळे करण्यात आले होते.
हाफिज सईदनंच पाक सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी उद्युक्त केलं होतं, असा खुलासा एका इंग्रीज वर्तमानपत्रानं केलाय. पाकिस्तानी सेनेनं दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा कट रचलेला होता. लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदच्या सदस्यांसोबत गुप्त बैठकीत हा कट रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
एलओसीवर तैनात १३ राजपुताना राइफल्सच्या शहीद हेमराज आणि सुधाकर सिंग यांच्यावर पाकिस्तानी सेनेबरोबर काळ्या कपड्यातील काही दहशतवाद्यांच्या टोळीनं हा भ्याड हल्ला केला. त्यामुळे या ह्ल्ल्यामागे हाफिजचा आणि पर्यायानं पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे भविष्यात अशा भ्याड हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराला अधिक सतर्क रहावं लागणार आहे.
First Published: Thursday, January 10, 2013, 12:59